Site icon HW News Marathi

शिंदे गटाच्या ‘या’ दोन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

मुंबई। शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षासोबत बंड पुकारले. यामुळेराज्यातील राजकीय संघर्षाला आता आज (२७ जून) एक आठवडा उडला आहे. शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची नोटीस बजावली होती. तसेच शिंदेनी पक्षासोबत बंड केल्यानंतर त्यांना पक्षाच्या गटनेते पदावरून हटविले. यानंतर शिंदे गटाने १६ आमदारांना अपात्रेची पाठवलेली नोटीस आणि शिंदेची गटनेते पदावरून केलेली हकालपट्टी या अशा दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची आज दुपारी 1 वाजता वाजता सुनावणी होणार आहे. या न्यायालय काय निर्णय देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या वतीने हरिश साळवे आणि महेश जेठमलानी बाजू मांडणार आहे तर शिवसेनेची बाजू कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडणार आहेत.
 गेल्या आठवड्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडली. यात शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. यात शिवसेनेचे मते फुल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर शिवसेनेने तातडीची बैठक बलवली होती. यात एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांचे फोन नॉट रिचेबल येवू लागले. यानंतर पक्षासोबत बंड पुकारले असून ते गुजरातमध्ये गेल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख यांची त्यांचे सचिन मिलिंद नार्वेकर यांना बंड केलेल्या आमदारांसोबत चर्चा करण्यात पाठविले. परंतु, या दोघांची बैठक असफल झाली होती. यानंतर शिंदे हे त्यांच्या १६ आमदारांसह गुवाहाटीला गेले असून सध्या ते गुवाहाटीला पंचतारांकित हॉटेल मध्ये आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या आरोपाला शिंदे हे ट्वीट करत प्रत्युत्तर दित आहे.
Exit mobile version