मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेत नवाब मलिक आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषदेत मतदान करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नकारली आहे. यामुळे मलिक आणि देशमुखांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पदरी निराशाच आली. जेल किंवा पोलीस कोठडीत असताना मतदानाचा हक्क बजावता येत नाही, या याचिकेवर आज (20 जून) सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती म्हणाले.
Senior Advocate Meenakshi Arora mentions plea by former Maharashtra Home Minister Anil Deshmukh and Minister Nawab Malik against Bombay HC order dismissing their plea to be released temporarily to vote in the upcoming Maharashtra Legislative Council elections today pic.twitter.com/g7qPzko0NU
— Bar & Bench (@barandbench) June 20, 2022
मलिक आणि देशमुख यांनी राज्यसभा आणि विधान परिषदे निवडणुकीत मतदान करता यावे, म्हणून विधान मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यामुळे मलिक आणि देशमुखांना मतदानाचा हक्क बजावला आला नव्हता. राज्यसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. विधान परिषदे तरी मतदान करता यावे म्हणून मलिक आणि देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मतदान करण्याची याचिका फेटाळून लावली