HW News Marathi
राजकारण

राज्यातील सत्तांतरावर पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार

मुंबई | राज्यातील सत्तांतरावर चार आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court )पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. २९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तब्बल सव्वा महिन्यानंतर न्यायालयात आज (1 नोव्हेंबर) सुनावणी झाली. न्यायालयात सत्तांतराची सुनावणीला सुरुवात होताच. न्यायालयाने ठाकरे आणि शिंदे गटांना कागदपत्रांचा गोषवारा सादर करा, असे आदेश दिले. घटनापीठाने आज झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षकारांनी लिखित बाजू मांडण्यास सांगितले असून दोन्ही बाजूने घटनापीठासमोर कोणते मुद्दे मांडण्यात यावे. आणि कोणते वकील बाजू न्यायालयात मांडतील यांची माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

 

न्यायालयात दोन्ही बाजूने एकत्रितपणे मुद्दे सादर करावे, असे घटनापीठाने आजच्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे. यात दोन्ही पक्षकारांच्या बाजूचे कनिष्ठ वकील बाजू मांडू शकतात. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षकारांनी संयुक्तपणे बैठक घेऊन न्यायालयात मांडण्यात येणारे मुद्दे ठरवावे. आणि जे मुद्दे न्यायालयात मांडण्यात येणार ते मुद्दे मोजके असावे असेही म्हटले असून या मुद्यांवर दोन्ही पक्षकारांचे कोणते वकील युक्तीवाद करतील हे सुद्धा निश्चित करण्यात यावे. न्यायालयात युक्तीवाद करताना तेच मुद्दे सारखे नेऊ नये, यांची खबरदारी म्हणून लिखित स्वरुपात मुद्दे दिल्याने घटनापीठाला सुनावणी घेण्यास आणि त्यावर निर्णय लिहिण्यास मतद होईल, असे न्यायालयाने म्हटले.

 

दोन्ही पक्षकारांच्या ‘या’ आहेत याचिका

शिंदे गटाने पक्षासोबत बंड करत वेगळी भूमिका मांडली. यानंतर भाजपसोबत हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात शिंदे गटाची याचिका, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले आणि  गटनेते एकनाथ शिंदेंच्या निवडविरोधातील ठाकरे गटाची याचिका, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधातील याचिका, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडविरोधाकीत ठाकरे गटाची याचिका, विशेष अधिवेशन बोलवण्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका, शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीविरोधात ठाकरे गटाची याचिका या याचिकेवर न्यायालयात आज पाच खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

 

घटनापीठात ‘या’ न्यायमूर्तीचा समावेश

गेल्या महिन्यात न्यायालयाच्या कामकाजात अनेक सुट्ट्या असल्यामुळे महिनाभरासाठी सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. अखेर महिनाभरानंतर राज्यातील सत्तांतरावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयात ही सुनावणी न्या. धनंजय चंद्रचूड, न्या.एम आर शहा,  न्या. कृष्ण मुरारी, न्या.हिमाकोहली आणि  न्या. पी नरसिंहा या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर राज्यातील सत्तांतरावर सुनावणी झाली आहे.

 

निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला दिले पक्षाचे नाव आणि चिन्ह

यापूर्वी न्यायालयाने खरी शिवसेना कोणती हे ठरविण्यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. खरी शिवसेना कोणाची आणि पक्षाचे चिन्ह यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे हे अधिका दिले होते. यानंतर  निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षाचे चिन्ह तूर्तास गोठावले. यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला वेगळे नाव आणि चिन्ह दिले. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले असून ढाल-तलवार हे चिन्ह दिले तर ठाकरे गटाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव तर धगधगती मशाल हे चिन्ह मिळाले आहे.

 

संबधित बातम्या

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुरू; पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार सुनावणी

Related posts

“भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही”, शरद पवारांची खंत

Aprna

जयकुमार रावलच्या पदाचा राजीनाम्याची मागणी – नबाव मलिक

News Desk

देशभरात सहाव्या टप्प्यात ५९.७०% मतदानाची नोंद, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

News Desk