HW News Marathi
राजकारण

महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ

मुंबई। महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या दहा सदस्यांचा शपथविधी, प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (८ जुलै) झाला.

नवनिर्वाचित सदस्य रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, सचिन अहिर यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यायमूर्ती लोयाच्या हत्येचा केसची सुनावणी सुप्रीम कोर्टात

swarit

“औरंगजेब तुमचा कोण लागतो, की तुम्ही ‘त्या’ निर्णयाला स्थगिती देताय?,” राऊतांचा शिंदे सरकारला सवाल

Aprna

उदयनराजे यांची भाजपमध्ये वापसी ? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Gauri Tilekar