Site icon HW News Marathi

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने ‘या’मुळे नकारली

मुंबई | शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्णयामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का मानला जातो. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी आज (20 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंची दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत येण्यास सांगितले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय येण्यापूर्वी देण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने ऐवढी घाई का केली? यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणार, उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमामध्ये म्हटले आहे.

 

 

Exit mobile version