Site icon HW News Marathi

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी होणार

मुंबई | महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविले आहे. हे विशेष अधिवेशन रविवारी (3 जुलै) आणि सोमवार  (4 जुलै ) आयोजित करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बलवण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे.  अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या (2 जुलै) दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार (3 जुलै) सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.

याआधी विशेष अधिवेशन हे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. यानंतर अधिवेशन रविवारी (3 जुलै) आणि सोमवार  (4 जुलै ) रोजी होणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी (3 जुलै) रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. आणि 4 जुलै रोजी शिंदे सरकार बहुमत चाचणी सिद्ध करणार आहे.

 अपात्र करण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार – सर्वोच्च न्यायालय

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता संघर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत पूर्णविराम घेतला आहे. शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या शिंदेसह 16 आमदारांना अपात्र करण्याच्या कारवाईच्या याचिकेवर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. परंतु, या याचिकेवर आजच (1 जुलै) सुनावणी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयता करण्याची मागणी केले हीतो. परंतु, या प्रकरणी न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यामुळे शिवसेनेच्या हाती मोठी निराशा लागली आहे.

संबंधित बातम्या
शिवसेनेला मोठा धक्का! शिंदे सरकारविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदेंनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
Exit mobile version