Site icon HW News Marathi

विधान परिषदेतील सर्व आमदारांची मते वैध

मुंबई | विधान परिषद निवडणुकीत मतदान करणारे सर्व आमदारांची मते वैध ठरली आहेत. विधान भवनात विधान परिषदेच्या आज (20 जून) सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तर सायंकाळी 4 वाजपेपर्यंत एकूण 285 आमदारांनी मतदान केले. विधान परिषदेत सर्वच्या सर्व 285 मतदान आमदारांची मते वैध ठरली आहेत.  काँग्रेसकडून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. यासंदर्भात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मेलद्वारे तक्रार केली आहे. परंतु, निवडणूक आयोगाने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले. यानंतर तब्बल 2 तासानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कायंदे यांचे मत अवैध ठरले होते. विधान परिषदेत निवडणुकीत गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. तरी सुद्धा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतपत्रिका दुसऱ्यांच्या हातात दिली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. विधान परिषदेत मतदान करताना दोन्ही आमदारांनी मतपत्रिकेवर सही केली होती. काँग्रेसने विधान परिषदेत पराभव दिसत असल्यामुळे हा आरोप केला असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केली.  भाजपच्या या दोन्ही आमदारांची प्रकृती ठिक नसताना देखील त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईत आले होते, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

संबंधित बातम्या
भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप; निवडणूक आयोगाला तक्रारीचा मेल
Legislative Council Election : अखेर 2 तासानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

 

 

 

 

Exit mobile version