Site icon HW News Marathi

‘आरे’तील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा! ‘मविआ’ सरकारने दिलेली स्थगिती शिंदेंनी उठवली

मुंबई | आरेतील कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. आरे मेट्रो कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागे घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने आरेमध्ये मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. यानंतर कांजूरमार्ग येथे नवीन कारशेडचे काम उभारण्यासाठी सांगितले होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कारशेड आरे करणार असल्याचे संकेत दिले होते. आणि आता अधिकृतरित्या आरे येथे मेट्रोचे कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

दरम्यान, शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडच्या कामाला दिलेली स्थगिती उठवली असून आता आरेमध्येच मेट्रोच्या कारशेडचे काम होणार असल्याचे निश्चित झाले आहे. जोपर्यंत आरेत मेट्रो कारशेडचे काम होत नाही. तोपर्यंत मेट्रो – 3 च्या नाईन सुरू करणे कठीण झाले होते. पावसाळा संपल्यानंतर पुढील वर्षभरात आरेत मेट्रो कारशेडचे काम पुर्ण करण्याचा मानस असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

 

Exit mobile version