Site icon HW News Marathi

नागपुरातील हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार

मुंबई | राज्याचे हिवाळी अधिवेश (winter session) हे नागपूरमध्ये सुरू आहे. हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत सुरू राहील, असा निर्णय संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अधिवेशनाचा कामकाज आणि कालावधी वाढवला जावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. यासंदर्भात चर्चा आणि संसदीय सल्लागार समितीची आज (28 डिसेंबर) बैठक झाली. परंतु, हिवाळी अधिवेसनाचा कालावधी वाढवण्यावर सरकार सकारात्मक नसल्याचे दिसत आहे. यामुळे विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी अमान्य होते. यामुळे नागपूरातील हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत सुरु असणार आहे.

अधिवेशनाची कामकाज पत्रिका आधी जशी बनली होती. तशीच 30 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे. आज सकाळी संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही एकमताने 30 डिसेंबरपर्यंत अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला. यापूर्वी संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत देखील 30 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशनाचे कामकाज होणार हे निश्चित होते. ठरल्याप्रमाणे नागपुरात दोन आठवड्याचे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज होणार आहे.

विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी तीन आठवडाचा करावा, अशी मागणी केली होती. परंतु, संसदीय सल्लगार समितीच्या बैठकीत 30 डिसेंबरपर्यंत अधिवेशन घेण्याचे सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले. आणि आता 30 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन सुरू रहणार आहे.

 

 

Exit mobile version