HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

…तर मनसे कार्यकर्त्यांवर होणार कायदेशीर कारवाई, पोलिसांकडून १४९ नोटीस

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरे यांना गुरुवारी (२२ ऑगस्ट) चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून कलम १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. राज यांच्या ईडीच्या चौकशीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून कलम १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

…तर मनसे समर्थक, कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई होणार

‘आपल्याकडून अथवा आपल्या सहकाऱ्यांकडून दादर पोलीस ठाणे हद्दीत दखलपात्र अथवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, चौकशीदरम्यान ईडीच्या कार्यालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून, समर्थकांकडून कायदा-सुव्यवस्थेत बाधा आणणारे कोणतेही कृत्य घडल्यास किंवा घडवून आणल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सदर नोटीस आपल्याविरुद्धचा पुरावा म्हणून वापरण्यात येईल’, असे या पोलिसांकडून कलम १४९ अन्वये बजावण्यात आलेल्या नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसासह फिरोजलाही फाशी द्या – सीबीआयची मागणी

News Desk

कोकण दौरा रद्द करून शरद पवार मुंबईकडे रवाना

News Desk

तुम्हाला थप्पड मारणं तर सोडाच पण साधा स्पर्श करण्याचीही इच्छा नाही !

News Desk