HW Marathi
देश / विदेश राजकारण लोकसभा निवडणुक 2019

… मग आम्ही पण बघतो कि काश्मीरमध्ये भारताचा झेंडा कोण फडकवितो ?

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी २०२० सालापर्यंत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि अनुच्छेद ३५ ए रद्द करण्याची घोषणा केली होती. भाजपने आज (९ एप्रिल) प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात देखील या मुद्द्याचा समावेश आहे. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांनी याबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. “कलम ३७० रद्द केले तर काश्मीरमध्ये भारताचा झेंडा कोण फडकवतो ते आम्ही बघतो”, असे वक्तव्य फारुख अब्दुल्लाह यांनी केले आहे.

“त्यांना वाटतं बाहेरून लोकं येतील, वास्तव्य करतील, आमची संख्या कमी करतील आणि आम्ही झोपून राहू ? आम्ही याचा सामना करू. तुम्ही कलम ३७० कसे रद्द कराल ? अल्लाहची शपथ घेऊन सांगतो, त्याचीही इच्छा हीच असेल. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले तर आमच्यासाठी स्वातंत्र्य मिळवणे आणखी सोपे जाईल. मग आम्ही पण बघतो कि इथे त्यांचा (भारताचा) झेंडा कोण फडकवितो ?”, असे फारुख अब्दुल्लाह यांनी म्हटले आहे.

Related posts

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जामीन मंजूर

News Desk

२०१९ मध्ये होणार ‘चंद्रयान-२’ प्रक्षेपण

Gauri Tilekar

गौरी लंकेश हत्या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले

News Desk