Site icon HW News Marathi

कोश्यारींना महाराष्ट्राचा कारभार नकोसा?; पदमुक्त होण्याच्या चर्चांवर राजभवनाकडून स्पष्टीकरण

मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. कोश्यारींची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा किंवा पदमुक्त होण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, या सर्व अफवा असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. राज्यपालांनी पदमुक्त होऊन पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा त्यांनी जवळी व्यक्तीकडे व्यक्त केली आहे, माध्यमांत सुरू असलेल्या चर्चा अफवा असल्याचे राजभवनानी माहिती दिली आहे.

राज्यपालांची कारकीर्दी ही नेहमी वादाच्या भुवऱ्यात राहिलेली आहे. नुकतेच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले होते. यानंतर राज्यपालांविरोधात निषेध व्यक्त करत आंदोलन आणि विरोध प्रदर्शन झाली. राज्यात राज्यपालांसदर्भात होणारा विरोध पाहात कोश्यारींनी स्वत: महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती टीव्ही 9  या वृत्तवाहिने दिले होते. या बातम्या किती खऱ्या आहे की खोट्या याबद्दल अद्याप अधिकृत अशा चर्चा माध्यमात रंगल्या होत्या.

दरम्यान, राज्यपालांनी यापूर्वी सावित्रीबाईंचे लहान वयात लग्न, राज्यापालांनी गुजराती-मारवाडी परत गेले तर काय होईल? असा सवाल केला होता. यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यपालांना रोष ओढावून घ्यावा लागला. सध्या राज्यात राज्यपालांविरोधात वातावरण तयार झाले आहे. राज्यपालांनी पदमुक्त होऊन पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा त्यांनी जवळी व्यक्तीकडे व्यक्त केली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

 

राज्यपाल नेमके काय म्हणाले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपालांनी कार्यक्रमादरम्यान म्हणाले, “तुमचा आदर्श कोण आहे. जेव्हा यापूर्वी विचाले जात होते. तेव्हा ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’, अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, आता महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत.”

Exit mobile version