Site icon HW News Marathi

“वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचा महाराष्ट्राशी सामंजस्य करार झाला नव्हता”, उदय सामंतांचा धक्कादायक खुलासा

मुंबई | “वेदांता-फॉक्सकॉन (vedanta-foxconn) प्रकल्पासंदर्भात कोणाताही एमओयू ( सामंजस्य ) करार झाला नाही,” अशी धक्कादायक माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) दिली आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेलामुळे शिंदे सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. उदय सामंत यांनी आज (15 सप्टेंबर) एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना धक्कादायक माहिती उघड केली आहे. या प्रकरणात नवीन माहिती समोर आली असून यामुळे राज्याच्या राजकारण आता कोणते वळण घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उदय सामंत म्हणाले, “वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचा कुठेही एमओयू ( सामंजस्य ) करार झालेला नव्हता”, असे ते म्हणाले. यावर प्रश्न विचारला गेला की, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाची सुरुवात कधी, ती कोणी केली आणि तुम्ही म्हटले की या प्रकल्पाचा एमओयू झाले नव्हता तर जागा कशी देऊ केली? या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले, “जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 2022 मध्ये पहिल्या  त्यांनी (वेदांता-फॉक्सकॉन) आम्हला आणि केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. अग्रवालांनी काल जे ट्वीट केले, या प्रकल्पाच्या चर्चेची सुरुवात, मात्र, दोन वर्षापूर्वी झाली होती. दोन वर्षापासून ते सांगतात की, पूर्वी वेगळा प्रकल्प येणार होता. तो गेला, ते ठिक आहे. तो जरी केला असला तरी हा प्रकल्प आणण्यासाठी स्वत: त्यांचे प्रयत्न चालू होते.”

नुसते भेटणे आणि नुसती चर्चा करणे म्हणजे उद्योग येत नाही

या मुलाखतीत सामंतांनी मुलाखतीत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी सामंत म्हणाले, “अनेकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, दावोसमध्ये ही सर्व मंडळी भेटली होती. मला फक्त एक सांगायचे आहे की, नुसते भेटणे आणि नुसती चर्चा करणे म्हणजे उद्योग येत नाही. उद्योगाला जे काही पाहिजे, कारण शेवटी तो देखील स्वत:चा फायदा बघत असतो. जे राज्य त्यांना सुटेबल असते. त्या ठिकाणी उद्योजक प्रकल्प नेहत असतो. काल अग्रवालांनी स्पष्टपणे सांगितले की, दोन वर्ष आम्ही हा प्रयत्न करतोय, यानंतर सुद्धा जे डील आम्हाला पाहिजे होते, ते सरकार देऊ शकले नाही. म्हणून आम्ही एमओयू करू शकलो नाही. कालनंतर एक चर्चा सुरु झाली, निम्मा प्रकल्प गेला की, यापेक्षा यांचे संलग्न जे उद्योग आहे. ते जे गुजरातला नेहणार होते. ते तरी महाराष्ट्रला द्यावे, अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मांडली. आणि काल त्यांनी ट्वीट केले की, बाकीच्या गोष्टींमध्ये जरी आम्हाला उशीर झाला असला, तरी संलग्न  जे प्रकल्प आहेत. ते सगळे आम्ही महाराष्ट्रमध्ये आणू जो बेरोजगारांना रोजगार द्याचा होता. तो देखील आम्ही नक्की देऊ, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली.”

 

 

 

Exit mobile version