Site icon HW News Marathi

रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ

नवी मुंबई | राज्यसभेत काँग्रेस खासदार रजनी पाटील (Rajani Patil) यांच्या निलंबनावरून गोंधळ सुरू आहे. रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत (Rajya Sabha) केली आहे. विरोधकांची घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी किंवा तो शेअर केल्याप्रकरणी जगदीप धंनकड (Jagdeep Dhankhar) यांनी रजनी पाटील यांच्यावर कारवाई केली होती. त्याविरोधात राज्यसभेत आज (13 फेब्रुवारी) आक्रमक झाले आहेत.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण संपन्न झाले होते. पंतप्रधनांच्या भाषणादरम्यान  विरोधक हे गदारोळ आणि घोषणा देत होते. आणि या गदारोळाचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्यावर भाजपने केला आहे.  राज्यसभेचे शुक्रवारी जेव्हा कामकाज झाले होते. तेव्हा रजनी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश सभापतीनी दिले होते. रजनी पाटील यांच्यावर एका अधिवेशनापुरते निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

यानंतर विरोधकांनी आज एकत्रित येऊन रजनी पाटील यांच्या निलंबन मागे घेण्यासाठी राज्यसभेत घोषणाबाजी केली होती. नियमांचे उल्लखन केले नसताना सुद्धा निलंबनाची कडक कारवाई करण्यात आलेली आहे.  या निलंबनाचा निषेध करण्यासाठी आता राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला आहे.

निलंबनाच्या कारवाईवर रजनी पाटील यांची प्रतिक्रिया

“तो व्हिडिओ जर त्यांनी शूट केला असला तरी व्हिडिओचे प्रसारण करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. आणि ते त्यांनी केले नव्हते. इतर लोकांनी गदारोळाचा तो व्हिडिओ टाकला आहे. एका महिलेवर अशा प्रकराची कारवाई आणि पहिल्यांदाच त्यांच्याकडून असे झाले असताना असे व्हावे, हे दुर्दैवी आहे”, अशी प्रतिक्रिया रजनी पाटील यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Exit mobile version