Site icon HW News Marathi

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटानंतर ठाकरे गटाचा आज टीझर लाँच

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत केली. यानंतर शिंदेंनी पक्षासोबत बंडखोरीनंतर त्यांची शिवसेना ही खरी शिवसेना (Shivsena)असल्याचा दावा केला आहे. यानुसार शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जाणारा शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर (Dasara Melava) सुद्धा शिंदे गटाने दावा केला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कवर शिवसेनेला (Shivsena) दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. यानंतर शिंदे गट वांद्र-कुर्ला संकुलात मैदानावर मेळावा होणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटात दसरा मेळाव्याच्या वादानंतर आता टीझर वॉर सुरू झाला आहे. ठाकरे गटाने आज (30 सप्टेंबर) दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला आहे तर शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी दोन टीझर लाँच केले आहेत.

या टीझरमध्ये दोन्ही गटाने शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्याच्या परंपरेचा दावा केला आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा टीझर ट्वीट करण्यात आले आहे. शिवसेनेने ट्वीटमध्ये लिहिले, “एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.” तर शिवसेनेने ट्वीट केलेल्या त्या व्हिडिओमध्ये, “भगवा अटकेपार फडकणार…महाराष्ट्राची ताकत दिसणार, असे लिहिले आहे. यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाजात ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी साद आहे. ऐतिहासिक दसरा मेळावा!”. तर या व्हिडिओ शिवसेनेचा भगवा झेंडा आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील काही फोटो दाखविले आहे.

शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर लाँच

शिंदे गटाने काल ( 29 सप्टेंबर) दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला आहे. शिंदे गटाच्या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाज आहे. ‘शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सातत्याने आसमानात भडकत राहिला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वांदे मातरम, असे आहे. तर ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’ अशा ओळी आहेत. या टीझर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो या टीझरमध्ये आहे.

 

Exit mobile version