Site icon HW News Marathi

देशात भाजपसोबत मुकाबला करण्यासाठी कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही! – जे. पी. नड्डा

मुंबई | “देशात भाजपसोबत (BJP) मुकाबला करण्यासाठी कोणताही प्रादेशिक पक्ष शिल्लक राहिलेला नाही,” असे वक्तव्य भाजपेच राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) यांनी केले आहे. भाजपची बिहार येथे 16 जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नड्डा हे पाटणा येथे बोलताना ते वक्तव्य केले. नड्डांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

जेपी नड्डा म्हणाले, “आमच्या पक्षाची विचारधारा ऐवढी मजबूत आहे की, दुसऱ्या पक्षात 20 वर्ष काम करणार लोक सुद्धा आमच्या पक्षात येत आहेत. आज भाजपसोबत राष्ट्रीय स्तरावर लढणारा पक्षच राहिला नाही. आम्ही वैचारिक विचारावर उभे आहोत. मी वारंवार लोकांना सांगतो, जर आपल्याकडे विचार नसते ना. तर आपण एवढी मोठी लढाई लढता आली नसती. सर्व संपले. आणि जे नाही झाले, ते नष्ट होती. राहणार तर फक्त भाजपच राहणार.”

“काँग्रेस देशातून नाही तर राज्यातील संपुष्टात येत आहे. तर भाजपची कार्यालय आणि कार्यकर्त्ये ही पॉवर हाऊत आहे. भाजपच्या कार्यालयात करोडो कार्यकर्ते जन्माला येतील. तर देशातील नवीव बाबूंचा पक्ष हा ओडिसातील एक पक्ष असून महाराष्ट्रात आता शिवसेना नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर शिवसेना ही एक कौटुंबिक पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर काँग्रेस भाऊ-बहिणींचा पक्ष आहे,” असे नड्डा म्हणाले.

 

 

 

 

 

Exit mobile version