Site icon HW News Marathi

“संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खुल्या मनाने संवाद साधायला हवा,” पंतप्रधानांचे खासदारांना आवाहन

मुंबई | “संसदेच्या अधिवेशनात खुल्या मनाने संवाद साधालाय हवा. जर गरज पडल्यास त्यावर चर्चा देखील व्हायला पाहिजे. मी सर्व खासदारांना चिंतन आणि चर्चा करण्याचे आवाहन करतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माध्यमांशी बोलताना म्हणाले. संसदेचे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन हे आजपासून (18 जुलै) ते शुक्रवारी (12 ऑगस्ट) होणार आहे. संसदेच्या अधिवेशान सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मोदी म्हणाले, “संसदेचा हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. यंदाच्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्येचे अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. पुढील 25 वर्षात देश स्वंतत्र्येची 100 वर्षपूर्ण करेल. या काळात आपण आपल्या देशाला नवीन उंचीवर  येवून पोहोचू. यासाठी आपण सर्वांनी संकल्प करण्याच वेळ आली आहे.”

या पावसाळी अधिवेशनात सरकार 14 दिवसांत 32 विधेयक संमत करण्याचे उद्दिष्ट आहे. या अधिवेशनात अग्निपथ योजना आणि चीन सीमेवरील स्थितीवरून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मोदी सरकारला विरोधक घेणार आहेत. यावरून अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्तता वर्तवली जात आहे.

 

 

 

Exit mobile version