Site icon HW News Marathi

“मविआ’चा प्रयोग फसला म्हणणे म्हणजे राजकीय अज्ञान”, शरद पवारांचा विरोधकांना टोला

मुंबई | “कोरोना सारखे राष्ट्रीय संकट असताना त्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम काम केले. हे सगळे बघितल्यानंतर हा प्रयोग फसला आहे. याचा अर्थ राजकीय अज्ञान”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना लगावला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंडखोरी केलेली आमदारांनावरून राज्यात गेल्या तीन दिवस राजकीय संघर्षसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आज (23 जून) पत्रकार परिषद केली आहे.

शरद पवार म्हणाले, “अडीज वर्ष महाविकास आघाडीने उत्तम कारभार केला. अनेक महत्वाचे निर्णय घेतले. कोरोना सारखे राष्ट्रीय संकट असताना त्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम काम केले. हे सगळे बघितल्यानंतर हा प्रयोग फसला आहे. याचा अर्थ राजकीय अज्ञान.”

महाविकास आघाडी अडचणीत आहे असे वाटते का?, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “असे आहे प्रसिद्ध माध्यमातून काही गोष्टी काही ते नाकारण्याचे कारण नाही. ज्या वेळेलेला हे विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले. ते इथे आल्याच्यानंतर माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने त्यांना नेहले गेले, त्यांची वस्थूस्थिती हे ते लोकांना सांगतील. आणि इथे आल्यानंतर आपण अजूनही शिवसेनेच्या बरोबर आहोत हे स्पष्ट करतील. आणि बहुमत कोणाचे आहे,  हे सिद्ध होईल.”

विधानसभेत मविकास आघाडीचे बहुमत सिद्ध होईल

ज्या पद्धतीने शिवसेनेचे 50 आमदार एकनाथ शिंदेसोबत आहेत, यावर शरद पवार म्हणाले, “सरकारचे संख्याबळ कमी आहे की नाही हे सर्व विधानसभेत सिद्ध होईल. विधानसभेत जेव्हा अविश्वासाचा ठराव होईल. तेव्हा कळेल की या सरकारला बहुमत आहे की नाही.”  मुख्यमंत्र्यांनी काल वर्षा निवासस्थान सोडले तर संकटावर मात करेल असे शरद पवार यावर म्हणाले, “महाराष्ट्रात मी अनेकदा अशी स्थिती पाहिली आहे. यातून माझा अनुभव असा आहे की, महाविकास आघाडी परिस्थितीतून बाहेर येईल. हे सरकार बहुमत सिद्ध करेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार चालू आहे हे संपूर्ण देशाला कळेल.”

संबंधित बातम्या
एकनाथ शिंदेंनी आमदारांचे भावनिक पत्र केले ट्वीट

 

 

 

 

 

Exit mobile version