HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“हा पुरावा किरीट सोमय्याला नाक घासायला लावणार”, अनिल परबांचा इशारा

मुंबई | “हा पुरावा किरीट सोमय्याला नाक घासायला लावणार आहे”, अशा इशारा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे. अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी जवळपास तीन तास चर्चा केली. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी वांद्रेच्या म्हाडा (MHADA) परिसरातील अनिल परबांचे कार्यालय असल्याचा आरोप केला होता. आणि म्हाडाने ते कार्यालय तोडले. या पार्श्वभूमीवर अनिल परबांनी म्हाडाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची जवळपास तीन तास चर्चा गेली होती. यानंतर अनिल परब कार्यालातून बाहेर आल्यानंतर आज (31 जानेवारी) माध्यमांशी बोलताना म्हाडा आणि भाजपचे नेते किरीट समोय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

अनिल परब यांनी किरीट सोमय्यासंदर्भात बोलताना म्हणाले, “किरीट सोमय्या यांच्याविरोधात बदनामीचा दावा ठोकलेलाच आहे. हा 100 कोटीचा दावा केला आहे. यात मला आज कायदेशीर पुरावा मिळालेला आहे. हा पुरावा किरीट सोमय्याला नाक घासायला लावणार आहे. असाच पुरावा अजून बाकीची जी प्रकरणे आहेत. त्या प्रकरणात ज्या दिवशी लेखी येईल, त्या दिवशी किरीट सोमय्याला नाक घासावे लागेल. किंवा 100 कोटी किरीट सोमय्याला द्यावे लागतील.”

अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची परबांची मागणी

“ज्या अधिकाऱ्यांनी मला कोणतीही शहानिशा न करता खोटी नोटीस दिली. अनिल परब यांचे या बांधकामाशी काही संबंध आहे की नाही. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मी मागणी केलेली आहे. कारण त्यांनी कोणतीही शाहनिशा न करता. मी एक आमदार आहे. आमदाराचे काही अधिकार असतात. म्हणून आमदारकीच्या अधिकाराचा भंग झालेला आहे. आणि मला नोटीस देताना किमान त्याची शाहनिशा करायला पाहिजे होती. ती न करता, त्यांनी अशा पद्धतीच्या नोटीस दिलेल्या आहेत”, असे संकेत अनिल परबांनी म्हाडाला दिला आहे.

बांधकामाचे नाकाशे मला आठ दिवसात मिळाले नाही तर…

“बांधकाम अनधिकृत कसे, हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून म्हाडाने मला असे सांगितले, आम्ही सगळे तपासून बघतो. आमच्या आर्कीटेकडे आहे का ते तपासतो. आणि असेल तर आठ दिवसात, सादर करतो”, असे आश्वासन म्हाडाने बैठकीत दिल्याची माहिती अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. अनिल परब पुढे म्हणाले, “जर मुळ बांधकामाचे नाकाशे जर मला आठ दिवसात मिळाले नाही. तर मी म्हाडावर हक्क भंग दाखल करेन. न्यायालयात जाईन, अशा प्रकारच्या नोटीसेस कोणताही आधार न घेता. हे लोक केवळ मानसिक त्रास म्हणून अशा पद्धतीने लोकांना त्रास देत आहेत.”

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Aprna

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन

News Desk

यंदा जगभरात साईपादुका दर्शन सोहळा!

News Desk