HW News Marathi
राजकारण

आज राज्यसभेतही सवर्णांच्या आरक्षणाचे विधेयक मंजूर होईल, अशी आशा !

सोलापूर | विविध विकास कामांच्या भूमिपूजन तसेच उद्घाटन कार्यक्रमांसाठी आज (९ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याला सुरुवात झाली असून सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. सोलापुरातील पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींची सभा सुरु आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील जनतेला संबोधित केले.

“माझी सोलापुरात येण्याची ही तिसरी वेळ आहे. जेव्हा जेव्हा मी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलो तेव्हा तेव्हा तुम्ही मला तुमच्या आशीर्वादातून मोठी ताकद दिली आहे. मी मागच्या वेळी आलो होतो तेव्हा वीज, रस्ता आणि पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू असे वचन मी तुम्हाला दिली होते. मला आनंद आहे कि आम्ही त्याच दिशेने काम करीत आहोत,” असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. “लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी, सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामीसमर्थ यांना मी साष्टांग नमस्कार करतो. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या सोलापूर भूमीत आपण सर्व मला आशीर्वाद द्यायला जमलात त्याबद्दल मी आपल्याला अभिवादन करतो”,असे म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आहे.

प्रत्येक घरात वीज पोहोचविण्यास प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असलेल्या फडणवीस सरकारला देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाचे देखील अभिनंदन केले आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या आरक्षणाचे विधेयक मंगळवारी (८ जानेवारी) रात्री उशिरा लोकसभेत मंजूर झाले, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणादरम्यान म्हणाले आणि लोकांनी टाळ्यांचा गडगडाट केला. त्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, तुमच्या या प्रतिसादावरून कळतंय कि तुम्ही देखील रात्री उशिरापर्यंत जागून लोकसभेचे कामकाज पाहत होतात.

आम्ही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता अतिरिक्त १०% आरक्षण दिले आहे. आज राज्यसभेतही समाजाच्या अखंडतेला बळ देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या आरक्षणाचे विधेयक मंजूर होईल अशी आशा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. सर्वांची प्रगती व्हावी, अन्यायाची भावना संपावी, प्रत्येकाला विकासाचा लाभ घेता यावा, देशातील लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजप समर्पित आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

आम्ही केवळ दिखाव्यासाठी काम करत नाही. निवडणुकांच्या तोंडावर नुसते भूमिपूजन करून वेळ मारून नेणाऱ्यांसारखे आम्ही आमचे काम नाही. ज्या कामाचे आम्ही भूमिपूजन करतो त्या कामाचे आम्ही उदघाटनही करतो. त्याचप्रमाणे २०२२ मध्ये सोलापुरातील ३०,००० घरांचे उद्घाटनही मीच करणार, असा दावा पंतप्रधान मोदींनी यावेळी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचा जाहीरनामा, सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत चर्चा करणार !

News Desk

#LokSabhaElections2019 : ‘बेरोजगार हार्दिक पटेल’, भाजपच्या प्रचार मोहिमेची उडविली खिल्ली

News Desk

…तोपर्यंत आम्ही कोस्टल रोडचे काम होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

News Desk