Site icon HW News Marathi

राज्यातील सत्तांतरावर पुन्हा एकदा अनिश्चिततेचं सावट; सुनावणी आज होणार की लांबणीवर जाणार?

मुंबई | राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज फैसला होणार आहे. परंतु, न्यायालयात सत्तांतरावर आज (25 ऑगस्ट) होणाऱ्या सुनावणीला पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट आहे. कारण न्यायालयाच्या कामकाजात अद्यापही राज्यातील सत्तांतर प्रकरणाचा समावेश केलेला नाही. त्यामुळे न्यायालयात आज सुनावणी होणाक का लांबणीवर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

दरम्यान, याआधी न्यायालयाने 23 ऑगस्ट रोजी कामात सप्लिमेंट्री लिस्टमध्ये  समाविष्ट केला नव्हता. परंतु, राज्यातील सत्तांतर प्रकरणाचा 22 ऑगस्टला रात्रीपर्यंत न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये समावेश केला नव्हता. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 23 ऑगस्टला होणार की पुन्हा एकदा लांबणीवर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे राज्यातील सत्तांतर सप्लिमेंट्री लिस्टमध्ये समावेश करण्याची विनंती केली होती. यानंतर न्यायालयात सत्तांतरावर सुनावणी घेण्यात आली.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार आहे. त्याआधी राज्यातील सत्तांतरचा ऐतिहासिक फैला होणार की हे प्रकरण खंडपीठाकडे सोपवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वतीने कपिल सिब्बल, आणि अभिषेक मनु सिंघवी वकील आहे. तर शिंदे गटाकडून हरीश साळवे न्यायालयात त्यांची बाजू मांडणार आहेत. तसेच निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार बाजू मांडत आहेत.

 

या आहेत 5 याचिका
1) शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात याचिका
2) शिंदे गटाचे प्रतोद गोगावले, गटनेते एकनाथ शिंदेंच्या मान्यतेविरोधात याचिका
3) एकनाथ शिंदे यांच्या शपथ विधी आणि विशेष अधिवेशनाविरोधात याचिका
4) राज्यपालांनी ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशाविरोधातील याचिका
5) शिंदे गटाचे प्रतोद गोगावलेंच्या व्हीपचे शिवसेना आमदारांकडून उल्लंघन झाल्याविरोधात याचिका
संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील सत्तांतर घटनापीठाकडे वर्ग; 25 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी

 

Exit mobile version