HW News Marathi
राजकारण

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर व्यक्तीची निवड

दिल्ली| महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी अप्सरा रेड्डी, या एक ट्रान्सजेंडर व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.यासंबंधीची माहिती राहुल गांधी आणि महिला काँग्रेस यांनी आपल्या ट्विटर पेजवरून दिली आहे . कॉंग्रेस हा पहिला राजकीय पक्ष आहे ज्यांनी तृतीयपंथी व्यक्तीची या पदावर नेमणूक केली आहे.

राहुल गांधींनी हा फोटो सोशल मीडिया वर शेअर केला आणि त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला,काँग्रेसचे हे पाऊल प्रगतशील भारताचे प्रतीक आहे अशा प्रतिक्रिया जनसामान्यांतून येत आहेत . काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी रेड्डी भाजपशी थोडा वेळ गुंतले होते आणि त्यानंतर एआयएडीएमकेमध्ये सामील झाले होते.

अप्सरा रेड्डी म्हणाले ” भाजपा एकदम प्रतिकूल आहे आणि स्वतंत्र विचारसरणीसाठी जागा नाही. मी अशा पार्श्वभूमीतून आलो आहे जिथे मला बऱ्याच पूर्वग्रह आणि अन्यायाला सामोरे जावे लागले. ढोंगीपणा आणि भेदभावानेच मला अन्यायाविरूद्ध कार्य करण्यास प्रवृत्त केले. देशातील सर्वात जुन्या आणि वरिष्ठ पक्षासाठी काम करण्याची संधी मला मिळतेआहे ,हि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. राहुल गांधींसारख्या युवा नेतृत्तवासोबत मला आमच्या समान हक्कासाठी काम करता येईल याचा मला आनंद आहे

कोण आहेत अप्सरा रेड्डी ?

  • मूळ आंध्रप्रदेशमधील असलेल्या अप्सरा यांनी आपले शालेय शिक्षण चेन्नई येथून पूर्ण केले आहे.
  • त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी लंडनमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
  • ऑस्ट्रेलिया आणि लंडन येथे काम करत असताना त्यांनी तृतीयपंथींच्या अधिकारासाठी काम केले.
  • अप्सरा रेड्डी यांनी ब्रॉडकास्ट जर्नालिझममधून पदवीचे शिक्षण घेतले आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“देव पाण्यात बुडवित बसलेली लोकं आता पक्ष बुडवायला निघाले,” उद्धव ठाकरेंचा आरोप

Aprna

राज ठाकरे-आशिष शेलार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk