HW News Marathi
राजकारण

बंडखोरी केल्याने तृप्ती सावंत यांची शिवसेनेकडून हकालपट्टी

मुंबई | वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेल्या नाराज असलेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून हे वृत्त देण्यात आले आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उमेदवारी देण्यात आली. विद्यमान आमदार असूनही आपल्याला उमेदवारी डावलल्याने तृप्ती सावंत नाराज होत्या.

उद्धव ठाकरे हे तृप्ती सावंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने यंदा या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती मिळते. तृप्ती सावंत यांचे पती तत्कालीन आमदार प्रकाश बाळा सावंत यांच्या निधनानंतर झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांचा तब्बल १९,००० मतांनी पराभव करून निवडून आल्या होत्या. मात्र, यंदाच्या विधानसभेत शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज तृप्ती सावंत यांनी पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने पत्रक प्रसिद्ध करून तृप्ती सावंत यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी काम करते तर तुमच्या पोटात का दुखतं ?

News Desk

“राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे ‘मविआ’मध्ये फूट पडू शकते”, संजय राऊतांचे संकेत

Aprna

“महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर लोकसभेत खडाजंगी

Aprna