Site icon HW News Marathi

नरहरी झिरवळ यांच्याविरोधात दोन अपक्ष आमदारांनी आणला अविश्वासाचा प्रस्ताव

मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेता एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांनी पक्षासोबत बंडखोरी केली आहे. या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव शिवसेना विधानसभेत मांडणार आहे. अपात्र ठरवणाऱ्या आमदारात एकनाथ शिंदेसह 16 आमदाराचा समावेश आहेत. परंतु, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात दोन दिवसापूर्वीच अविश्वासचा प्रस्ताव आणला आहे. यात झिरवाळ यांना सदस्यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार नसल्याचे पत्र अपक्ष आमदारांनी विधानसभा सचिवांना पाठविले आहे.

दरम्यान, अपक्ष आमदारांनी विधानसभा सचिवांना पाठविलेल्या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा संदर्भ दिला आहे. यापत्रात अपक्ष आमदारांनी म्हटले, “विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षविरोधात जर अविश्वास प्रस्ताव आणला असेल तर त्या सदस्यांना अपात्रेविरोधात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही,” असे यात नमूद केले आहे. याआधी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना प्रस्ताव मंजूर करण्याचा आणि एखाद्या सदस्याला अपात्रे करण्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार असतो, असेही या पत्रात म्हटले.

एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवसनेने त्यांना पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. यानंतर शिवसेनेने विधीमंडळाच्या गटनेता पदावर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी नेमणूक केली होती. यानंतर शिंदेंनी गटनेते पदावर त्यांचा पदावर दावा केला होता. यानंतर शिवसेनेने विधीमंडळाच्या मुख्य प्रतोद पदावर सुनील प्रभू यांची नियुक्ती केली होती. परंतु, शिंदे गटाने प्रभूच्या नियुक्ती अवैध ठरवली. आणि त्या जागी .भरत गोगावले यांची शिंदे गटानी नियुक्ती केली.

संबंधित बातम्या
एकनाथ शिंदेंनी केली सुनील प्रभू यांची विधीमंडळ मुख्य प्रतोद पदावरून उचलबांगडी

 

 

 

Exit mobile version