HW News Marathi
राजकारण

Prithviraj Chavan Exclusive | उदयनराजे भोसले किमान २ लाख मतांनी पराभूत होतील !

कराड | विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना राज्यातील प्रचार ऐन रंगात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या प्रचाराकरिता राज्यभर सभा घेत आहेत. रविवारी (१३ ऑक्टोबर) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कराड विधानसभा मतदारसंघात अमित शाह यांची सभा झाली. याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी खास बातचीत केली. “सातारा लोकसभा पोटनिवडणुकीला उदयनराजे भोसले किमान २ लाख मतांनी पराभूत होतील”, असा दावा कराड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी एच डब्ल्यू.मराठीशी बोलताना केला. “मी जरी लढलो असतो तरीही आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीदेखील उदयनराजे २ लाख मतांनी पराभूत होतील”, असे चव्हाण म्हणले.

मी घाबरून माघार घेतली हा अपप्रचार !

सुरुवातीला सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकरिता भाजप उमेदवार उदयनराजे भोसलेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यानंतर चव्हाण यांचे नाव मागे पडून श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी मिळाली. या पार्श्वभूमीवर देखील चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सातारा लोकसभा मतदारसंघात हा राष्ट्रावादीचा आहे. पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून अशी सूचना आली कि सातारा लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसने म्हणजे मी लढवावी. मी त्यावेळी सांगितले कि पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. त्यानंतर त्यांनीच निर्णय घेतला कि राष्ट्रावादीची जागा आहे तर राष्ट्रवादीच्याच उमेदवाराने निवडणूक लढवावी. म्हणून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, मी घाबरून यातून माघार घेतली हा अपप्रचार आहे”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांची मानसिकता राजेशाही, आम्ही मात्र जनतेचे सेवक !

News Desk

ईडीच्या चौकशीनंतरही माझं तोंड थांबणार नाही !

News Desk

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागा !

News Desk