मुंबई | उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांच्या वैचारिक विचारसरणीचे आहे. त्यामुळे आम्हाला युतीची चर्चा सुरू असल्याचे वंचित बहुनज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर हे आज (16 जानेवारी) औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदे घेऊन वंचित आणि उद्धव ठाकरे ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) युतीसंदर्भात भाष्य केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा एकत्र होता. बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववाद हा संधीसाधूपणाचा होता. बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व हे अवसरवादी हिंदुत्व होता. उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांच्या वैचारिक विचारसरणीचे आहे. त्यामुळे आम्हाला युतीची चर्चा सुरू असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.”
चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करायला तयार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्राकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत म्हणाले, “मी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करायाल तयार आहे. मी पाटलांना तारीख मागितली आहे. शिवाजी पार्कात 5 लाख लोके बोलवून त्यांच्यासमोर सत्कार करेन. कारण म्हणजे ते सत्य बोलले, कोणी कोणी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या. मग त्या भीकेतून का असेना”, असे ते यावेळी म्हणाले