Site icon HW News Marathi

“…उद्धव ठाकरेंचे अस्तित्व संपले”, नारायण राणेंची बोचरी टीका

मुंबई | “मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्याच दिवशी उद्धव ठाकरेंचे अस्तित्व संपले”, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. कोकणातील नाणार रिफायनरी होणार असून आणि कोणाचाही विरोध चालू देणार नाही, असेही राणेंनी आज (18 सप्टेंबर) मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंचे अस्तित्व कुठे आहे?, उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्याच दिवशी त्यांचे अस्तित्व संपले. आणि आता त्यांचे अस्तित्व फक्त मातोश्रीपुरते मर्यादित होते. राज्यात आणि देशात उद्धव ठाकरेंचे अस्तित्व कुठेही नाही. त्यांचे अस्तित्व आता कुठेही नाही. उद्धव ठाकरेंचे अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहे,” असे टीकास्त्र त्यांनी केले आहे.

दसरा मेळाव्यासंदर्भात राणे म्हणाले, “शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्याची परवानगी ही शिंदे गटाला मिळायला हवी. याव्यतिरिक्त धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळाणार आहे, अशा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच राणे पुढे म्हणाले, “दसरा मेळावा कोणाचा होणार यांचा निर्णय न्यायालयात होईल. आणि हा निर्णय शिंदे गटाच्या बाजूनेच लागणार आहे, अशी भविष्यवाणी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली,

 

 

 

Exit mobile version