HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर शिवसेना ठाम, उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता

मुंबई | राज्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीने आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या सत्तास्थापनेसंदर्भात सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमताचा कौल दिलेला असताना देखील मुख्यमंत्रीपद आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज (७ नोव्हेंबर) थोड्याच वेळापूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर हे सर्व नेत्यांनी राजभवनावर जाण्यापूर्वी ‘वर्षा’ बंगला गाठला आहे. तर दुसरीकडे त्याचवेळी ‘मातोश्री’वरील शिवसेना आमदारांची देखील बैठक संपली असून शिवसेना अजूनही आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, या शिवसेनेच्या या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार वांद्र्यातील रंगशारदा सभागृहाकडे रवाना झाले असून थोड्याच वेळात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात बोलणार असल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक लढवून दाखवा, पंकजा मुंडेंचे आव्हान

News Desk

“दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SITमार्फत चौकशी होणार; उपमुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा

Aprna

बांगलादेशमध्ये हसीना यांचा चौथ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा

News Desk