Site icon HW News Marathi

“ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे”, उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई | “ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे”, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारकडे केली. उद्धव ठाकरे यांनी आज (29 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन हिवाळी अधिवेशन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आदी मुद्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. गेल्या सहा महिन्यामध्ये हे सरकार नेमके करतय काय? हे लोकांच्या समोर तरी आलेले आहे, असा सवाल करत राज्य सरकारला टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “या अधिवेशन काळामध्ये रोज एक-एका मंत्र्यांच्या घोटाळ्याविषयी चर्चा झालेली आहे. आरोप झालेले आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहिला. तर साधारणतहा आरोपांची गंभीरता लक्ष्यात घेऊन ज्या ज्या खात्यांच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे. पण, तसे त्या त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले. परंतु, तसे या वेळी मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील असे वाटत नाही. परंतु, गेल्या सहा महिन्यामध्ये हे सरकार नेमके करतय काय? हे लोकांच्या समोर तरी आलेले आहे.”

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला

“गेल्या दोन आठवड्यांपासून आपले हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशन असले तरी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला हे तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. उद्या हे अधिवेशन संपेल. पण, हे अधिवेशन संपल्यानंतर या अधिवेशनापेक्षा सत्ताधाऱ्यांनी अर्थात विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला नमके काय दिले. हा एक महत्वाचा प्रश्न उभा राहणार आहे. याचे उत्तर संगळ्यानी दिले पाहिजे. आजही दोन्ही सभागृहात विविध प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. तसे वेगवेळ्या प्रश्नांवर चर्चा झालेली आहे. पण, सुरुवातीपासून बघितले. तर साधारणतहा 52 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या या मांडल्या गेल्या त्यांना मान्यता दिली गेली. आता त्यांची कशा पद्धतीने अंबलबजावणी होणार आहे”, असे ही उद्धव ठाकरेंनी म्हणाले.

अधिवेशनात विदर्भासाठी योजना जाहीर झालेली नाही

विदर्भासंदर्भात बोलतान उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये हे अधिवेशन होत आहे. त्या विदर्भाला अजूनही काय देणार, याचे उत्तर अजूनही सरकारकडून मिळालेले नाही. अतिवृष्टी झाली, मग पिक कर्जाची गोष्ट असेल अजून काही रोजगाराच्या संध्या होत्या. ज्या इथून येणारे उद्योग इतर राज्यात गेले. ती रोजी रोजीची हिराऊन घेतलेली संधी हे आपले सरकार विदर्भवासियांना कसे पुर्ण करून देणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाही. विदर्भासाठी काही खास योजना कारण पॅकेज हा शब्द नुसता तोंडावर फेकायला असतो. तो पॅकेज घोषित होतो, आणि नंतर त्यांची अंबलबजावणी होते की नाही. याचा पाठ पुरावा कोणी करत नाही. पण, तरी देखील नेमक्या ठोस काही योजना विदर्भासाठी अद्याप तरी या सरकारकडून जाहीर झालेल्या नाही.”

 

 

Exit mobile version