HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पंतप्रधान मोदींना विकली !

मुंबई | “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पंतप्रधान मोदींना विकली आहे”, अशी बोचरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मनसेने आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आपण राज्यभर भाजपविरोधी प्रचार करणार असल्याचे देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे राज ठाकरे सध्या राज्यभर सभा घेत आहेत. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी जर राज ठाकरेंना ‘पक्षप्रमुख’ केले असते तर त्यांनी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला विकली असती”, अशा पोस्ट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संदीप देशपांडे यांनी या पोस्टला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेला टोला लगावला आहे. गेली ५ वर्षे भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने वारंवार विरोधी पक्षाची भूमिका बजावली. मात्र, निवडणुका आल्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. गेली ५ वर्षे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपसह पंतप्रधान मोदींवर वारंवार टीका आणि आरोप करणारी शिवसेना निवडणुकांसाठी आणि सत्तेसाठी भाजपसोबत गेल्याने युतीनंतर शिवसेनेवर जोरदार टीका देखील झाली. “पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शहांसोबत तुम्ही जाणार का ?”, असा सवालही मनसेने शिवसैनिकांना विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2019च्या निवडणुकांमध्ये मोदी ना इथले राहतील ना तिथले। माजिद मेनन

News Desk

ज्यांची भांडणे ही विनोदी वाटतात, ते युध्दाची भाषा करत, भागवंतांच्या वक्तव्याची- धनंजय मुंडे ची खिल्ली

swarit

कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधक एकवटणार

News Desk