HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे एनडीएच्या मेजवानीसाठी दिल्लीत जाणार

नवी दिल्ली | एनडीएतील मित्र पक्षांची आज (२१ मे) संध्याकाळी मेजवानीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत निर्माण झालेला संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता उद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीला आणि मेजवानीला उपस्थित राहणार असल्याची अधिकृत माहिती एएनआयने दिली आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह परदेश दौऱ्यावर गेले होते. ते आज मुंबईत परतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रताप सरनाईक यांच्या मुलाच्या विवाहास उपस्थिती लावली. मात्र उद्धव ठाकरे हे संध्याकाळी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत डिनरला जाणाऱ्या पाहुण्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या आधी आलेल्या बहुतांश एक्झिक्ट पोलमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपसोबत एनडीएमध्ये ४० लहान-मोठे पक्ष आहेत. यामधील ९ पक्षांचा मोठा प्रभाव आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे. यानंतर जदयू, अण्णा द्रमुक, एआयएडीएमके, पीएमके, डीएमडीके, अकाली दल, लोजप, अपना दल, असम गण परिषद यासह ४० पक्ष एनडीएमध्ये आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या महिला आघाडी-युवासेनेने अयोध्येत येऊ नये | ठाकरे

News Desk

…तोपर्यंत ही सगळी निवडणुकीची जुमलेबाजी सुरूच राहील !

News Desk

शिवतीर्थावर आज होणार मनसे ‘राज’गर्जना

News Desk