HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा रद्द, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा

मुंबई | आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठलरखुमाईच्या शासकीय महापूजेसाठी यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील सपत्नीक उपस्थित असतील अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी मिळत होती. मात्र, आता उद्धव ठाकरे यांचा हा पंढरपूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, आता वर्षानुवर्षांच्या परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलरखुमाईची शासकीय महापूजा होणार आहे. मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह गुरुवारी (११ जुलै) संध्याकाळी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला असता यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती.“काही लोक जर सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला जाऊन भेटण्यात कुणाची हरकत नसावी”, असा म्हणत संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर टोला देखील लगावला होता. त्याचप्रमाणे, लोकसभेपूर्वी पंढरपूरवासियांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आषाढीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे पंढरपूरचा दौरा करतील अशी देखील माहिती मिळत होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचा हा दौरा रद्द झाला आहे.

Related posts

मोदी सरकारचा क्रांतिकारक निर्णय

News Desk

भिमा कोरेगावचे पडसाद उल्हासनगरात . संपुर्ण शहर बंद .

News Desk

राज्यभरात कडाक्याची थंडी

News Desk