HW News Marathi
राजकारण

ठाकरेंच्या सभेपुर्वीच शिवसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (२४ डिसेंबर) पंढरपूर दौऱ्यावर आहेत. दुपारी दोनच्या सुमारार उद्धव ठाकरे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरातून हिंदुत्वाची हाक देणार आहेत. पंढरपूर वारीसाठी मुंबई, ठाणेसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिवसैनिकांना या सभेसाठी पाचारण करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे सभा सायंकाळी ४.३० सुमारास होणार आहे. यासभेत युतीसंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उद्धव यांच्या सभेसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या शिवसैनिकांनी ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

फडणवीस आणि दानवे यांचा एकेरी उल्लेख करत ही घोषणाबाजी करण्यात आली. ‘रावसाहेब दानवेचे करायचे काय खाली डोके वर पाय’ तसेच ‘फडणवीसाचे कसे काय खाली मुंडके वर पाय’ अशी घोषणाबाजी या शिवसैनिकांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे या शिवसैनिकांनी राम मंदिर झालचे पाहिजे अशी घोषणाबाजी देखील केल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले असून यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला आहे. ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यातील सभेत शिवसैनिकांसह वारकरी संप्रदायाला मोठ्या प्रमाणात सहभागी करून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे नेते, कार्यकर्त्यांनी ताकद पणाला लावली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागणार,” उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

Aprna

देशातील पहिले २ रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद

News Desk

ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराला एसीबीने पाठविली नोटीस

Aprna