Site icon HW News Marathi

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन; असा आहे मुंबई दौरा

मुंबई ।  गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे काल मुंबईत आगमन झाले. वायुदलाच्या विशेष विमानाने रात्री ९.४९ वाजताच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन,आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
असा आहे अमित शहांचा मुंबई दौरा
 
  • अमित शहा सकाळी ९ वाजता दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेणार आहेत.
  • अमित शहा सकाळी १० वाजता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहचणार आहेत
  • अमित शहा सकाळी ११.१५ वाजता आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देणार आहे.
  • अमित शहा दुपारी १२ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन येथे भाजप पदाधिकारी बैठक आणि त्यानंतर स्नेहभोजन करणार आहेत.
  • अमित शहा दुपारी २ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतील.
  • अमित शहा दुपारी ३.३० वाजता नायक चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
  • अमित शहा सायंकाळी ५. ५० वाजता मुंबई विमानतळाहून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत.
Exit mobile version