Site icon HW News Marathi

“शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा झाला,कारण…”, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई | “शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा झाला.  कारण शिमग्याला शिव्या द्यायचे काम होते”, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून (dasara melava) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी आज (7 ऑक्टोबर) मुंबईतील भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

नारायण राणे म्हणाले, “शिवसेनेचा यावेळचा शिवाजी पार्कचा दसरा मेळावा म्हणजे तमाशा पद्धतीचा मेळावा होता. शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा झाला.  कारण शिमग्याला शिव्या द्यायचे काम होते. हे चित्र पवित्र शिवतीर्थावर पाहायला मिळाली असून त्यांनी शिव्या शाप देण्यासाठी दसरा मेळावा घेतला होता का?, असे चित्र दिसत होते. दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी फक्त शिव्या देण्याचे काम केले. दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणा मिळत होती. या मेळाव्यातून आमची जडणघडण झाली. यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहे. साहेब बोलायचे तेव्हा लोक एका जागेवरून हालत नव्हते. उद्धव ठाकरे बोलायला लागले की लोक उठून जातात.  परंतु, आताचे विचार पाहिले तर त्यांना दुसरे काही येत नाही मला माहिती नाही. जर उद्या कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरे असतील. कारण आम्ही आमच्या नेत्यांवर टीका केली तर आम्ही खपवून घेणार नाही.”

“अपघाताने मुख्यमंत्री झालात आणि अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात आलात का?, मराठी माणसांसाठी तुम्ही काय केले ते एक काम तरी सांगा”, असे म्हणत त्यांच्या मुख्यमंत्री पदावरून राणेंनी टीका केली. पुढे हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर बोलताना राणे म्हणाले, “हिंदुत्वाबद्दल काही बोलू नये. त्यांचे बेगडी हिंदुत्व आहे.”

 

Exit mobile version