Site icon HW News Marathi

राज ठाकरेंच्या भेटीसाठी नारायण राणे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दाखल

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. नारायण राणे हे सपत्नीक आपल्या आज (31 डिसेंबर) राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे. नारायण राणेंनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) सदिच्छा भेट घेतल्याची प्राथमिक माहिती माध्यमातून मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात मतभेद आहेत. हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु, राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. राज ठाकरे आणि नारायण राणे या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्यावर चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षभरात राज ठाकरेंच्या निवासस्थानी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज ठाकरेसोबतची जवळीक वाढल्याचे सर्वांच माहिती आहे. यामुळे राज ठाकरे आणि भाजप यांच्यासोबत युतीच्या चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यामुळे राज ठाकरेंच्या निवासस्थानी भाजप नेत्यांच्या वर्दळी पाहिल्या की, पुन्हा पुन्हा या चर्चांना उधाण येते.

 

Exit mobile version