HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

‘त्या’ नेत्यांची नावे जाहीर करावी -अजित पवार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धक्कादायक विधान केले आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते आघाडीच्या राजकारणाला कंटाळले असून आता त्यांची पक्षात राहण्याची इच्छा नाही. या दोन्ही पक्षावर नाराज असलेले अनेक नेते माझ्या संपर्कात असल्याच विखे पाटील म्हणाले आहेत. विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिले

‘भाजपच्या वाटेवर कशाला? जे आमदार जाणार आहेत, त्यांची नावंच विखे पाटलांनी जाहीर करावीत. उद्या कुणीही काहीही म्हणेल. जे जायचे असतील, ते जातील’ अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली आहे.

Related posts

मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही !

News Desk

मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस संपले – शाहू छत्रपती

News Desk

सरसंघचालक मोहन भागवतांवर ‘मोक्का’ लावा !

Gauri Tilekar