मुंबई | दादर येशील शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठीचे निश्चित झाले असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर या बंगल्याची जागा करण्यात आली आहे. या ठिकाणी सीआरझेडचे नियम, हरित क्षेत्राचे नियम, हेरिटेज इमारतीविषयीचे नियमही मोडीत काढण्याचे प्रयत्न केले जात आहे,’ असा गंभीर आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
Maharashtra: Petition filed in Bombay HC against the proposal of Balasaheb Thackeray memorial at Mayor's bungalow in Dadar, Mumbai. Petition seeks cancellation of orders for change of the land user of the said plot, as it's in green zone & in violation of coastal regulatory rules pic.twitter.com/StRvkzOkKl
— ANI (@ANI) January 10, 2019
बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्याच्या तळघरात (अंडरग्राऊड) बांधण्यात येणार आहे. या स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या सारख्या ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कोणत्याही प्रकारे तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.
‘कोणतेही सरकारी निवासस्थान हे स्मारकासाठी देऊ नये, असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे’, असे निदर्शनास आणत महापौर बंगल्याच्या जागी स्मारक उभारण्यास विरोध दर्शवणारी भगवानजी रयानी यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात आधीच प्रलंबित आहे. त्यात आता आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मिळवल्यानंतर या प्रकरणात पर्यावरणविषयक कायदा व नियमांचा भंग झाला असल्याचा दावा करत अॅड. वाय. पी. सिंग यांच्यामार्फत नवी जनहित याचिका केली आहे. ही याचिकाही रयानी यांच्या याचिकेसोबत न्यायालयासमोर सुनावणीस येण्याची शक्यता आहे.
महापौरांचे स्थलांतर
बाळासाहेबांच्या स्मारकांसाठी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना लवकरच महापौर बंगला सोडून राणीच्या बागेतीलपर्यायी निवासस्थानी राहायला जावे लागणार आहे. महिनाअखेरीसपर्यंत स्मारकाच्या भूमिपुजनाचाही कार्यक्रम पार पाडण्यात येणार, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
महापौर बंगल्याचा इतिहास
सन १९२८ साली हा बंगला बांधण्यात आला होता, त्यानंतर १९६२ साली बीएमसीने हा बंगला विकत घेतला. तर डॉ. बीपी. देवगी यांना महापौर म्हणून या बंगल्यात राहण्याचा पहिला मान मिळाला. सन १९६४-६५ मध्ये या बंगल्याचा महापौरांसाठी अधिकृतपणे वापर करण्यात आला. शिवाजी पार्क आणि बाळासाहेब यांचे अतुट नाते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तसेच महापौर बंगला हा शिवाजी पार्कापासून अगदीजवळ आहे. या ठिकाणी बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.