HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान सुरू; तांबे कुटुंबियांनी आणि शुभांगी पाटलांनी केले मतदान

मुंबई | राज्यातील विधान परिषदेच्या (Legislative Council) पाच जागांसाठी आज मतदान सुरू आहे. यात पदवीधर (Graduate Election) 2 जागा तर शिक्षक मतदारसंघाच्या (Teacher Constituency Election) तीन जागांसाठी आज (30 जानेवारी) सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अमरावती आणि नाशिक येथील पदवीधर तर नागपूर कोकण आणि औरंगाबाद या शिक्षक मतदारसंघाच्या समावेश आहे. या मतदारसंघात सायंकाळी चाप वाजेपर्यंत मतदान करता येणार असून 2 फेब्रुवारीला विधान परिषदेच्या पाच जागांचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत नागपूर आणि नाशिक या दोन मतदारसंघातील अटीतडीचा सामना होणार आहे. या दोन्ही मतदारसंघाच्या कोण विजयी होईल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे.

या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. परंतु, डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचे चिरंजीव सत्यजीव तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या घटनेमुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. सत्यजीत तांबेंनी पक्षाविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांची हकालपट्टी केली होती. यानंतर महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. आता सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या चुरसेची लढत पाहायला मिळत आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या समर्थनाने विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे सुधाकर अडबाले मैदानात उतरले आहेत. यात भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार आणि सुधाकर अडबाले यांच्या लढत होणार आहे. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसला लढणार आहे. यात काँग्रेसकडून धिरज लिंगाडे तर भाजप, शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) आणि रिपाइं (आठवले गट) युतीचा उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या निवडणूक होणार आहे.

दरम्यान, कोकण शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला असून भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे हे निवडणूक लढवित आहेत. तसेच औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काळे उमेदवार आहे तर भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरूद्ध भाजप असा सामना करत आहेत.

 

Related posts

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात ६०.२१ टक्के मतदान

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

News Desk

  “आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागलं”, अजित पवारांचा भाजपला उपहासात्मक टोला 

News Desk