HW News Marathi
राजकारण

पक्ष वाढवण्यासाठी सरकारचा वापर करणे हा आमचा विचारच नाही !

नवी दिल्ली | “आम्हाला सरकार देखील बनवायचे आहे आणि देशही घडवायचा आहे. आपला पक्ष वाढवण्यासाठी सरकारचा वापर करणे हा आमचा विचार नाही. सरकारचा उपयोग हा केवळ देश घडवण्यासाठीच झाला पाहिजे”, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले आहे. “भाजपचे कार्यकर्ते केवळ निवडणुका आल्या कि मैदानात उतरत नाहीत. ते सदैव जनतेच्यासोबत असतात. जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात ते त्यांच्यासोबत असतात”, अशा शब्दात मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे देखील कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदी हे आंध्र प्रदेशमध्ये बोलत होते. पंतप्रधान मोदी हे त्यांचा श्रीलंका दौरा आटोपून रविवारी (९ जून) आंध्र प्रदेशमध्ये दाखल झाले. यावेळी मोदींनी आंध्र प्रदेशच्या जनतेला उद्देशून भाष्य केले. केंद्र सरकार आंध्र प्रदेशमधील जनतेसाठी इथल्या सरकारला मदत करण्यास तयार आहे. लोकांच्या हितासाठी आम्ही नेहमीच काम करत राहू, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाला कंठस्नान घालण्यात यश

News Desk

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाले…

Aprna

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज मनसेचा पदाधिकारी मेळावा

News Desk