HW News Marathi
राजकारण

दाऊदसाठी आता भीक मागितली जाते मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली !

मुंबई | १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट व दंगलीचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिम समर्पण करण्यास तयार होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घणाघाती हल्ला चढविला आहे.

प्रकाश आंबेडकर पुढे असे देखील म्हणाले की, “सुषमा स्वराज्य यांनी २ दिवसांपूर्वी दाऊद आणि मसूद अझहर यांना भारतास सोपविण्याची मागणी केली होती. मात्र काही वर्षांपूर्वी स्वतः दाऊदने भारतात परत येण्याची इच्छा राम जेठमलानी यांच्याकडे व्यक्त केली होती. जेठमलानी यांनी ही माहिती शरद पवारांना दिली होती. पवारांनी यांची माहिती तत्कालीन पंतप्रधानांना, यंत्रणांना दिली होती का ? किंवा दाऊदच्या समर्पणाचा निर्णय त्यांनी स्वत: का नाकारला ?, याची पवारांनी उत्तर द्यावीत, असेही प्रकाश आंबेडकर आज (१९ मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • दाऊदसाठी आता भीक मागितली जाते आहे. मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली
  • सुषमा स्वराज यांनी दाऊद ला आणण्याची मागणी केली
  • शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊद आणि राम जेठमलानी यांची भेट झाली
  • दाऊद भारतात परत यायला तयार होता फक्त थड डिग्री वापरू नका असं दाऊद म्हणाला होता
  • जेठमलानी यांनी ही माहिती शरद पवार यांना दिली होती
  • ती माहिती पंतप्रधान यांच्याकडे पोहचवली होती का?
  • शरद पवार यांनी ही माहीती स्वतःकडे ठेवली त्याच्यात त्यांच काय
  • दाऊद त्यांनी का नाकारला हे सांगावे
  • आता काँग्रेस त्यांच्यासोबत का आघाडी करते याच उत्तर द्यावा आणि पंतप्रधान शरद पवार यांच्या घरी का जातात ? याचेही उत्तर त्यांनी द्यावे.
  • शरद पवार मुख्यमंत्री असताना हा हा प्रस्ताव दिला होता
  • आता आपण दाऊद पाहिजे म्हणून पाकिस्तानकडे भीक मागत आहोत
  • राम जेठमलानी आणि मी त्यावेळी सभागृहात एकत्र होतो
  • फास्ट हँड इन्फॉर्मेशन आहे
  • रामदास आठवले यांच्यावर उत्तर देण्यासारखं नाही
  • कोळसे पाटील यांनी टीका केली. पण ते जर लढले असते तर भाजपला मदत झाली नसती. आता लढत नाही तर त्यांना मदत होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर संघावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे आश्वासन

News Desk

“गेल्या अडीच वर्षात ‘मविआ’ सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना,” एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Aprna

कंटाळा झटका, कामाला लागा !

Gauri Tilekar