HW News Marathi
राजकारण

“उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी प्रयत्नशील,” आदित्य ठाकरेंची माहिती

मुंबई | “उत्तर प्रदेशात 100 खोल्याचे महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत,” अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आदित्य ठाकरे आज (15 जून) अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. ‘मी येथे तीर्थयात्रेला आलोय, राजकीय यात्रा नाही, मी दर्शन घ्यायला आलो आहे, इथे राजकारण करायला आलो नाहीये,’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरें माध्यमांशी बोलताना म्हणाले.

उत्तर प्रदेशात 100 खोल्याचे महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना त्यांनी केले आहे. रामलल्लांच्या दर्शनाने रामराज्य आणू शकतो, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत, असे ते यावेळी म्हणाले.

राजकीय यात्रा नाही. मी दर्शन घ्यायला आलोय

“अनेक शिवसैनिक अयोध्येत आले आहेत. मी गेल्या तीन चार वर्षात चौथ्यांदा अयोध्येत आलो आहे. पण, आजही तसाच उत्साह आहे. माझ्यासोबत प्रसारमाध्यमही आहेत. मी आपल्याला विनंती करेन की हा जल्लोश देशाला दाखवावा. मी येथे तीर्थयात्रेसाठी आलो आहे, राजकीय यात्रा नाही. मी दर्शन घ्यायला आलो आहे, येथे राजकारण करायला आलो नाहीये,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

 

 

 

Related posts

साध्वी प्रज्ञा सिंहचे प्रायश्चित, पाळणार २१ तास मौन

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचा राजीव कुमार यांना धक्का, हटविली अटकेवरील स्थगिती

News Desk

प्रियांका गांधींच्या ट्विटर अकाऊंटला जोरदार प्रतिसाद

News Desk