HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

आम्ही प्रसिद्धीच्या उद्देशाने मदत केली नाही- जयंत पाटील

पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत म्हणून प्रशासनाने मोफत अन्नधान्य वाटप केले आहे. मात्र ही मदत करताना भाजप सरकारने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. या जाहिरातबाजीवरून फडणवीस सरकारला लोकांनी फटकारलं.  तर हे टोले मारण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आघाडी मारली होती. राष्ट्रवादी पक्षाने देखील पूरग्रस्त भागात मदत म्हणून देणाऱ्या अन्न धान्यांच्या पाकिटावर नेत्यांचे फोटो टाकले आहेत, अशी बातमी अनेक माध्यमांनी दाखवली

आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे, त्यांनी म्हटलयं ,

दिनांक १ ऑगस्ट रोजी राजारामबापू पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील विविध शाळांत वाटण्यासाठी खाऊचे बॉक्स तयार करण्यात आले होते. ४ तारखेपासून पुराची हि दुर्दैवी परिस्थिती उद्भवली व त्यावेळी आम्हाला कुठेही बॉक्स व पॅकिंग साठी इतर साहित्य मिळत नव्हते, त्यामुळेच आम्ही हे बॉक्स वापरले. यात मदत देताना प्रसिद्धी करण्याचा अजिबात उद्देश नाही. अजूनही आम्हाला बॉक्सची कमतरता आहे तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी बॉक्स व पॅकिंग मटेरियल पाठवावे.

Related posts

भुजबळ यांच्या जामीनावर सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टचा नकार

News Desk

चर्चा योग्य दिशेने सुरू, निर्णय लवकरच कळेल !

News Desk

रजनीकांत यांचं राजकारण भगवं नसावं, | अभिनेता कमल हासन

Kiran Yadav