Site icon HW News Marathi

“मी मुख्यमंत्री पदी नको, समोर येऊन सांगा मग…,” मुख्यमंत्र्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन

मुंबई | “आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पदी नको ठिक आहे, मी मुख्यमंत्री पदावरून उठतो,” असे भावनिक आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वरे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांना केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (22 जून) पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 35 बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. यानंत एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुजरातला गेले. आम्ही शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही, असे शिंदेंनी काल (21 जून) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज सुद्धा सकाळी काँग्रेसचे नेते कमनलनाथजी आणि काल सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन केला होता. मला म्हणाले, उद्धव ठाकरे आम्ही तुमच्यासोबत आहोत. हा त्यांच्या विश्वासाचा विषय आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यानंतर. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदी नको असेल. तर काय करायचो. हा मोठा प्रश्न आहे. माझीच लोक बोलत असतील की, त्यांना त्यांना तुम्ही हवे आहे, परंतु आम्हाला तुम्ही नको. मग मला हेच बोलयाचे आहे की, माझ्या लोकांना मी त्यांना माझे म्हणतोय, ते मला आपले माणत आहे की नाही ते मला माहीत नाही. कारण ते माझ्यासमोर नाहीत. तर तुम्ही इथे येवू बोलयाला काय हरकत नव्हती. तुम्ही सुरतला जावून बोलण्यापेक्षा सरळ समोर येईचे म्हणायचे की,  उद्धवजी तुम्ही कारभार करायला नालायक आहात. हे कोव्हिडच्या काळातील टॉप पाच सोडून द्या. आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पदी नको ठिक आहे, मी मुख्यमंत्री पदावरून उठतो. आणि आज पण मी तुम्हाला सांगतो. त्यांच्यापैकी एकाही आमदारांनी मला सांगितले. किंवा त्यांनी जर स्टेटमेंट दिले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर नको, तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्याला तयार आहे. जर त्यावर विश्वास नसेल तर आज आपले फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज सांध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहेत.”

मला खुर्चीला चिटकून बसणारा माणूस नाही

“मला कोणताही मोह नाही. मी ओडून ताडून खुर्चीला चिटकून बसणारा माणूस नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. कोणताही मोह मला खेचू शकत नाही आणि अडवू शकत नाही. पण हे माझ्या समोर येवू बोला उगाच शिवसेनेची गद्दारी करणार नाही. पण ही शिवसेना आणि ही शिवसेना तुम्ही कशाला हे करत आहात. या सर्ववरून कोणाचे नुकसान होत आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करणार

 

 

Exit mobile version