मुंबई। आम्ही शिवसेना सोडलेली नाही सोडणार नाही, अशी भूमिका बंड केलेले सेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदेच्या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत मते फुटल्यामुळे सेनेच फुट पडली. यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी बंडाचे हत्यार उपसले. बंड पुकारलेल्या सर्व आमदार गुजरातमधील एका हॉटेल मध्ये मुक्काम केला. सेनेच्या आमदारांनी बंड पुरकालेची माहिती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळेपर्यंत खूप उशीर झाला. यानंतर सेनेचे सचिव आणि पक्ष प्रमुखांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर यांनी शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे आणि त्यांचे समर्थक काल (२१ जून) मध्य रात्री गुहाटीला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत आहेत. आणि मला कोणावरही टीका करायची नाही. आम्ही सर्व जण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी हिंदुत्वाची जी शिकवण दिली. ती शिकवण घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. माझ्यासोबत ४० आमदार येथे आहेत आणि आणखी १० येणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलेले नाही. आम्ही कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे राजकारण आणि समाजकार करणार आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला. यात तडजोड करणार नाही आणि हाच विचार घेऊन पुढे जातोय. “