Site icon HW News Marathi

“आणखी मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ म्हणजे…”,वेदांता प्रकल्पावरुन पवारांचा शिंदे सरकारला टोला

मुंबई | “वेदांता-फॉक्सकॉनपेक्षाही (vedanta-foxconn) मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रात आणू म्हणजे एखाद्या घरामध्ये लहान मुलाला फुगा दिला कोणी आणि दुसऱ्या मुलगा त्याला फुगा मिळाला नसेल. तसे लहान मुलांची समजू काढावी,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे सरकारला लगावला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज (15 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर निशाणा साधला. वेदांत-फॉक्सकॉन गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 

शरद पवार म्हणाले, “आणखी एक गोष्टी सांगायची पंतप्रधान यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. पंतप्रधान यात काही मदत करणार आहे तर आनंदाची गोष्ट आहे. पण, हे जे सांगण्यात आले. त्यापेक्षा आणखी मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ म्हणजे एखाद्या घरामध्ये लहान मुलाला फुगा दिला कोणी आणि दुसऱ्या मुलगा त्याला फुगा मिळाला नसेल. तर पालक सांगतात की, काही काळजी करू नको, त्यापेक्षा मोठा फुगा तुला आणून देईन. तसे लहान मुलांची समजू काढावी, अशा प्रकारची ती समजूत आहे. यात महाराष्ट्राची काही प्रतिष्ठा नाही. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतोय यावर चर्चा न केलेली बरी.”

 

मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री उद्धव ठाकरे सरकारवर टीका करणे म्हणजे गंमत

या प्रकल्पावर शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांवर टीका करतान म्हणाले, “हा प्रकल्प तळेगावला येणार होता. राज्य सरकारने जी काही आवश्यक आहे. त्या नियोजनाची तयारी ठेवली होती. नंतर यात बदल झाला, आणि त्या यात आता काही बदल दिसत नाही. काही लोकांनी सांगितले, हा निर्णय बदलावा आणि प्रकल्प महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही, असे व्हायला नको होते. महाराष्ट्राचा हा प्रकल्प बाहेर जायाला नको होता. पण गेला आता प्रकल्प गेल्यानंतर त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. यानंतर दोन गोष्टी बघितल्या मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री या दोघांचे मत असे होते, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रकल्पासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. त्याला उद्धव ठाकरे सरकारने ही जबाबदार आहे, आता गंमत अशी आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत हे मंत्री होते. आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे देखील मंत्री होते. हे दोघेही मंत्री त्यावेळी मंत्री मंडळात होते. या मंत्रिमंडळाने दुर्लक्ष केले वैगेरे वैगेर करत आहेत.”

 

केंद्राची सत्ता हात असल्यामुळे गुजरातला लाभ

“केंद्राची सत्ता हाता असल्याचे परिणाम हे काही राज्यांसाठी अनुकुल होत असतात. यात दुसऱ्या कोणाला लाभ मिळाला असेल तर आपण तक्रार करण्याचे काही कारण नाही. मोदी-शहा स्वत: तिथे आहेत. या सर्वांकडे देशाती सूत्र आहेत. थोडे बहुत लक्ष त्यांनी गुजरातकडे दिले. तर आपण समजू शकतो, तुम्ही जर मोदीसाहेबांचे दौरे काढले तर जास्तीत जास्त कोणत्या राज्यात जातात. एक-दोन राज्यांचा रेकोर्ड काढला तर सहाजिक आहे की घरची ओढ असते”, असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

 

तळेगावमध्ये कंपनीला अधिक फायदेशीर झाला असता

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले की, “तळेगाव हा जो स्पॉट आहे , त्याच्या आजूबाजूचा चाकण आणि रांजनगाव हा या देशातला  ऑटोमोबाईलच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे येथे जर प्रकल्प टाकला असता तर कंपनीला अधिक फायदेशीर झाला असता. त्या कंपनीने ही हा निर्णय घेतला. आता हे काही नवीन नाही, हा जो प्रकल्प आहे, वेदांता नावाच्या ग्रुपचा आहे. तिथे अग्रवाल त्यांनी यासंबंधितीचा निर्णय घेतला, हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मला हे काही नवी वाटत नाही.

 

 

Exit mobile version