May 24, 2019
HW Marathi
महाराष्ट्र राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पायदळी !

मुंबई | “पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पायदळी,” असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपला वाढते समर्थन पाहता त्यांना पराभवाची भिती वाटू लागल्यामुळे ममता बॅनर्जींनी भाजप नेत्यांना जाणूनबुजून पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी मनाई करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये काल (१४ मे) भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान मोठा हिंसाचार झाला. रोड शो दरम्यान अमित शहा उभे असलेल्या ट्रकवर काठ्या फेकण्यात आल्या. ताफ्यावर दगडफेकही झाली. त्यानंतर जाळपोळीचे प्रकारही घडले. या सर्व प्रकार  निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि तेथील निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

 

 

Related posts

नथुराम गोडसे प्रकरणी कमल हासन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

News Desk

भूमिपूजनापूर्वीच शिवस्मारकाच्या खर्चात १००० कोटींची वाढ

News Desk

निता अंबानी साईबाबांच्या चरणी

News Desk