June 26, 2019
HW Marathi
देश / विदेश राजकारण

बंगालमध्ये राहायचे असे तर बंगाली भाषा आलीच पाहिजे !

कोलकाता | पश्चिम बंगाल डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर संपूर्ण देशभरातून एक दिवसीय संप पुकारून निषेध व्यक गेला आहे. या प्रकरणामुळे सर्व बाजून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका होत आहे. यानंतर ममता यांनी बांग्ला भाषेचे कार्डचा वापरून करून बंगालमधील परप्रांतियांवर निशाणा साधला आहे.

बाहेरच्या लोकांवरून भाजपवर नेम दरत त्यांनी जर बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली बोलता आलीच पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर फिरतात, असेही ममता एका कार्यक्रमात म्हणाल्या.

उत्तर परगना जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करताना ममता यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपल्याला बंगाली भाषेला पुढे आणले पाहिजे. जेव्हा मी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पंजाबमध्ये जाते तेव्हा तेथील भाषा बोलते. जर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये राहत असाल तर तुम्हाला बंगाली भाषा आलीच पाहिजे. अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर इकडे तिकडे फिरतात, असे ममता म्हणाला.

 

Related posts

RamMandir : उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला मनसे शुभेच्छा !

News Desk

सर्वोच्च न्यायालयाकडून श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी उठविली

News Desk

राज ठाकरे विरोधी गोटात सामिल होणार ?

Ramdas Pandewad