Site icon HW News Marathi

“देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर…” संजय राऊतांचा इशारा

मुंबई | “मला अटक करून किती मोठी चूक केली. ती देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक कोणती असेल. तर संजय राऊतांना अटक केली “, असा इशारा शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिली. राऊत बुधवारी (9 नोव्हेंबर) पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने  राऊतांना जामीन मंजूर केला. तब्बल 100 दिवसांनी राऊत ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. राऊत तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वीच ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून त्यांचे स्वागत केले. तसेत मध्य रात्र राऊत त्यांच्या भांडूपच्या घरी पोहोचल्यावर उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाध साधला.

 

राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कसा असोत. हे आज महाराष्ट्र आणि देशाने पाहिले. याच रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले होते. तेव्हा ही तुम्ही जमला होतात, तेव्हाही मी जाताना सांगितले होते, मरण पत्करने पण शरण जाणार नाही. ही शिवसेना तीन महिन्यात आपली शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गेल्या तीन-चार महिन्यामध्ये तोडण्याचा फोडण्याचा उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला. पण ती तुटलेली नाही. ही अभेदय शिवसेना, ही बुलंद शिवसेना आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या विजयाने दाखवून दिले. मशाल भडकलेली आहे. आणि एकच शिवसेना महाराष्ट्रात राहिल, ती म्हणजे बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची. आता त्यांना कळेल की, मला अटक करून किती मोठी चूक केली ती. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक कोणती असेल, तर संजय राऊतांना अटक केली.”

मी शिवसेनेला त्यागणार नाही

राऊतांनी न्यायालयातील सुनावणीत ईडीला टीका केल्यासंदर्भात बोलताना म्हणाले,  “आज न्यायालयाने सांगितले की, संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊतांवर कोणताही गुन्हा नाही. या न्यायालयाने सांगितल्यावर ज्यांनी मला अटक केली. ते मुंबई उच्च न्यायालयात धावत पळत गेले. पळू त्या.  मला कितीही वेळा अटक करा, मी शिवसेनेला त्यागणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलो, आणि या भगव्याबरोबरच जाईन. बाळासाहेब ठाकरेंनी मला जो मंत्र दिलाय. या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. तो ही आपल्या शिवसेनेचा. माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो, तो हमारी सरकार आए गयी,”

संबंधित बातम्या

अखेर संजय राऊत तुरुंगातून बाहेर, पहिलीच प्रतिक्रिया देत म्हणाले…

तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही संजय राऊतांना उद्या न्यायालयात हजर रहावे लागणार, कारण…

संजय राऊतांच्या सुनावणीदरम्यान PMLA न्यायालयाने ‘या’ कारणामुळे ED ला फटकारले

संजय राऊतांचा जामीन स्थगित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Exit mobile version