Site icon HW News Marathi

‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन सुरु असलेल्या राजकारणात आता नवे ट्विस्ट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई | “थिएटरमध्ये काल जो प्रकार घडला तो लाच्छंनास्पद आहे. मी या प्रकरणाचा निषेध करतो”, अशी प्रतिक्रिया हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे (Abhijit Deshpande) यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील थिएटरमध्ये शो बंद करताना झालेल्या राड्यावर म्हणाले. या पार्श्वभूमीवर देशपांडेंनी आज (8 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर टीका केली.

अभिजित देशपांडे म्हणाले, “ठाण्यातील विवियाना मॉलच्या थिएटरमध्ये काल जो काही प्रकार घडला तो लाच्छंनास्पद आहे. मी या प्रकरणाचा निषेध करतो. जर आपण स्वत: ला शिवरायांचे भक्त म्हणवतो. तर आपण त्यांनी दिलेल्या शिकवणीसारखे वागले पाहिजे. चित्रपटातील ज्या सीन्सवर आक्षेप घेतला आहे. त्यासंदर्भातील ऐतिहासिक पुरावे आम्ही सेन्सॉर बोर्डला दिले आहेत. त्या सर्व पुराव्यांच्या आधारावर आम्हाला सेन्सॉर बोर्डने सर्टिफिकेट दिले आहे.”

नेमके काय आहे प्रकरण

“महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा”, असा धमकीवजा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी (6 नोव्हेंबर) पुण्यात पत्रकार परिषदेतून केला आहे. यावेळी ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटात उल्लेख करत मराठी निर्माते, दिग्दर्शकांनावर संभाजीराजे छत्रपती यांनी हल्लाबोल केला होता. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी हर हर महादेव चित्रपटावर आक्षेप घेत ठाण्यातील विवियाना मॉलमधील थिएटरमध्ये शो बंद केला. यानंतर थिएटरमध्ये प्रक्षकांना बाहेर जाण्याचे आवाहन केले. यावेळी माध्यमांशी बोलतान आव्हाड म्हणाले, “या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी लढताना दाखविण्यात आले आहे. मुळात असे काही झाले नव्हते. यानंतर जसे रघुनाथाला हनुमान होता, तसे बाजीप्रभू हे शिवाजी महाराजांना होते. परंतु, तसे काही नाहीये. तेथे जेधे-बांधल नावाचे सरदार होते. ते शिवाजी महाराजांचे त्याबद्दलचे हे वक्तव्य आहे,” असे ते म्हणाले.

 

 

 

 

 

 

Exit mobile version